Jaysmits Fertilizer

जयास्मित्स फर्टीलायझर्स चे Var – Sh

हळदीची लागवड साधारणपणे एप्रिल महिन्याच्या मध्यापासून ते जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी. एक हेक्‍टर हळद लागवडीसाठी २५ क्विंटल जेठे गड्डे (मातृकंद आकाराने गोल) बियाणे आवश्‍यक असते. आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे वापरल्याने उत्पादन अधिक येते. ३५ ते ४० ग्रॅम वजनाचे तसेच रसरशीत, नुकतीच सुप्तावस्था संपवून थोडेसे कोंब आलेले असावेत. गड्डे स्वच्छ करून त्यावरील मुळ्या काढून घ्याव्यात. कुजलेले, अर्धवट सडलेले बेणे लागवडीसाठी वापरू नयेत सरी वरंबा पद्धतीत ३० सें.मी. अंतरावर गड्ड्यांची लागवड करावी किंवा वाकुरी पाण्याने भरल्यानंतर गड्डे पाण्यामध्ये वरंब्यात ३ ते ५ सें.मी. खोल दाबून घ्यावेत.पाण्यात लागवड करताना गड्डे खोलवर जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. जर गड्डे खोल लावले गेले तर उगवणीवर परिणाम होण्याची शक्‍यता असते. सरी – वरंबा पद्धतीमध्ये सरीच्या दोन्ही बाजूस ३७.५ x ३० सें.मी. अंतरावर वरंब्यांमध्ये लागवड करावी, रुंद वरंबा पद्धतीत ३० x ३० सें.मी. अंतरावर लागवड करावी.सेंद्रिय खताचा जास्तीत जास्त वापर केल्यास उत्पादनवाढीस फायदा होतो. लागवडीपूर्वी पूर्वमशागतीच्या वेळी शेणखत जमिनीत मिसळावे.माती परीक्षणानुसार हेक्‍टरी २०० किलो नत्र, १०० किलो स्फुरद आणि १०० किलो पालाश द्यावे. संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळी द्यावे. नत्र मात्र २ हप्त्यात विभागून द्यावे. पहिला हप्ता लागवडीनंतर ४५ दिवसांनी द्यावा. दुसरा हप्ता भरणीच्यावेळी लागवडीनंतर १०५ दिवसांनी द्यावे. तसेच भरणीच्या वेळी हेक्‍टरी दोन टन निंबोळी किंवा करंज पेंडीचा वापर करावा. लागवड एप्रिल-मे महिन्यात होत असल्याने सुरवातीच्या काळात पाऊस पडेपर्यंत पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. कारण दरम्यानच्या काळात मुळे जमिनीत रुजणे गरजेचे आहे. या कालावधीत आंबवणीचे पाणी लगेच ४ ते ६ दिवसांच्या अंतराने द्यावे. जमिनीच्या प्रतीनुसार हा कालावधी कमी-जास्त ठेवावा. हळदीची मुळे आणि निवडलेल्या आंतरपिकांची मुळे जमिनीत एका खोलीवर येणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. तुरीसारख्या पिकांचा वापर हळदीमध्ये सावलीसाठी करावा. २५ टक्के सावलीमध्ये पीक चांगले वाढते. जयास्मित्स फर्टीलायझर्स चे Var – Sh हळदीचे गुणवत्ता वाढवण्यास व भरगोस पीक देण्यास मदत करते. हळद पिकाचे भरपूर उत्पादन मिळवण्यासाठी आजच वापरा जयास्मित्स फर्टीलायझर्स चे Var – Sh ठेवावा.हळदीची मुळे आणि निवडलेल्या आंतरपिकांची मुळे जमिनीत एका खोलीवर येणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. तुरीसारख्या पिकांचा वापर हळदीमध्ये सावलीसाठी करावा. २५ टक्के सावलीमध्ये पीक चांगले वाढते.

जयास्मित्स फर्टीलायझर्स चे Var – Sh हळदीचे गुणवत्ता वाढवण्यास व भरगोस पीक देण्यास मदत करते. हळद पिकाचे भरपूर उत्पादन मिळवण्यासाठी आजच वापरा जयास्मित्स फर्टीलायझर्स चे Var – Sh

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *