Jaysmits Fertilizer

केळी पिकाची लागवड व व्यवस्थापन

केळी चे शास्त्रीय नाव म्युसा पॅरॅडिसियाका असे असून ही म्युसेसी कुलातील एकद लिकित व बहुवर्षायू वनस्पती आहे. केळी पिका चे मूलस्थान आशिया खंडाच्या आग्नेय भागात मानले जात असून आशिया खंडाच्या उष्ण कटिबंधातील सर्व प्रदेशांत केळीची लागवड पुरातन काळापासून केली जात असल्याचे दिसून येते.भारताचा जगामध्ये केळी उत्पादनात पहिला क्रमांक लागतो. भारतामध्ये केळीच्या सुमारे १४ जाती आढळून येतात त्यामधील बसराई, हरी साल, लाल वेलची, सफेद वेलची, मुठेळी, वाल्हा व लाल केळ या जातींची पिकलेली केळी तशीच खाण्यासाठी वापरत असून बनकेळ आणि राजेळी जातींची केळी शिजवून किंवा तळून खातात.केळीची लागवड कंदापासून करतात.फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेती मध्ये पाच बाय पाच फुटाच्या अंतरावर खड्डे करून केळीच्या झाडांची लागवड योग्यरीतीने करावी. केळीची लागवड करताना जवळपास दोन मीटर अंतरावर कडेने शेवरीच्या झाडांची लागवड म्हणजेच कुंपण करावी यामुळे येणारे वारे हे शेवरीच्या झाडांना अडून केळीच्या झाडांचे नुकसान होण्या पासून थांबवते.केळीच्या झाडाची कापणीस यायला एक वर्षाचा कालावधी हा लागतो.त्यामुळे जर फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केळीची लागवड केली तर पुढच्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये केळी ची झाडे कापनिस येतात.केळी पिकास नत्राचा पुरवठा युरिया खताच्या माध्यमातून करावा.केळी पिकास भरपूर पाण्याची आवश्यकता असते मात्र पाणी खोडा जवळ साचून राहू नये ह्याची पुरेपूर काळजी घ्यावी.तसेच पाण्याचे प्रमाण हे केळीचे झाडांच्या वाढीवर अवलंबून असावे. अती कडक उन्हाळ्यात केळीच्या झाडांना पाच ते सहा दिवसांनी पाणी देणे गरजेचे आहे. केळीच्या लागवडीचे एक पीक घेण्यास अठरा महिने लागते म्हणजेच अठरा महिन्यांमध्ये 45 ते 70 वेळा पाणी द्यावे लागते. जयस्मित्स फर्टीलायझर्स चे PVS Boron पिकांमध्ये होणारी बोरॉन ची कमतरता टाळण्यास मदत करते तसेच अधिक फुले आणण्यास मदत करते तसेच फुलांची गळती रोखण्यासाठी आणि फळांना तडे जाण्यापासून रोखण्यासाठी उपयुक्त आहे. केळीचे भरपूर उत्पादन मिळवण्यासाठी आजच वापरा जयस्मित्स फर्टीलायझर्स चे PVS boron.हवामानाचा विचार करता फेब्रुवारी हा महिना केळी पिकाच्या लागवडी करिता योग्य मानला जातो कारण वेगाने वाहणारे वारे गारपीट पिकांवर होणारे विपरीत परिणाम या सगळ्यांनचा विचार करता फेब्रुवारी हा महिना केळी पिकाच्या लागवडीस योग्य ठरतो.केळी या पिकाची लागवड करण्याकरिता मध्यम ते भारी, कसदार आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीची खोली 60 सें. मी. पर्यंत असावी. जमिनीचा सामू हा 6.5 ते 8 दरम्यान असावा. माती परीक्षण करून घ्यावे.क्षारयुक्त, चोपण आणि चुनखडीयुक्त जमिनीत केळीची लागवड करू नये.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *