भारतात तसेच दक्षिण आशियातील इतर देशांत प्राचीन काळापासून लागवडीत असलेली ही सुपरिचित वनस्पती. समशीतोष्ण व उष्ण प्रदेशांतील बर्याच देशांत उसाची लागवड प्रामुख्याने साखरेसाठी केली जाते. भारतात इ.स.पू. ३२७ पासून ऊस हे महत्त्वाचे पीक असल्याचे आढळते. चौथ्या व सहाव्या शतकांदरम्यान भारतात साखरनिर्मिती सुरू झाली. तेव्हा ही साखर खड्यांच्या स्वरूपात होती. नंतर आज आपण पाहतो तशी साखर उपलब्ध होऊ लागली. ऊस आणि त्यापासून मिळणारे रस, काकवी, गूळ व साखर हे खाद्यपदार्थ आहेत. ऊस हे नगदी पीक आहे. भारतात, महाराष्ट्र,उत्तर प्रदेश,आंध्र प्रदेश व तमिळनाडू या राज्यांत उसाची लागवड विशेष होते. उसाला पाणी जास्त द्यावे लागत असल्याने जमिनीतील क्षार पृष्ठभागावर येतात. अशा क्षारपड जमिनी पिकासाठी निरुपयोगी होतात. अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याची सोय केल्यास जमीन पुष्कळ वर्षे चांगले पीक देत राहते असा अनुभव आहे. ऊस ही बहुवर्षायू वनस्पती असून ती सु. ६ मी. पर्यंत वाढते. ऊसाची खोडे वेगवेगळ्या जाडीची असून रंगानेही वेगळी असतात. पाने सामान्यतः १.५ मी. लांब, अरुंद, चिवट, ताठ किंवा लोंबणारी असून रंगाने फिकट ते गडद हिरवी असतात. फुलोरा मोठा पिरॅमिडसारखा असून कणिशाचा तळभाग लांब व तलम केसांसारख्या तंतूंनी वेढलेला असतो. फळ आयताकार किंवा गोल असते. उसाच्या लागवडीसाठी सर्वसाधारणपणे तीन डोळे असलेल्या कांड्या वापरतात. ऊसासाठी मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी. उभी आडवी नांगरट, कुळवणी इ.मशागत करुन जमीन चांगली भुसभुसीत करावी. उस उगवण अवस्थेमध्ये सुरुवातीच्या काळात वरंबा बुडेपर्यत पाणी देऊ नये. यावेळी ऊसाला जास्त पाणी दिल्यास नत्रयुक्त खते वाया जातात. कमी पाण्यामुळे जमिनीतील पाणी व हवा यांचा समतोल राखला जातो. गुळाची वाढ व कार्यक्षमता योग्य राहते. जयास्मित्स फर्टीलायझर्स चे NPK 10:54:10,NPK 00:48:47,NPK 00:14:48 फांद्यांची चांगली वाढ करते. आणि उसाची जाडी व लांबी वाढवते. तसेच साखरेचे परिणाम वाढवते . ऊसाचे भरपूर उत्पादन मिळवण्यासाठी आजच वापरा जयास्मित्स फर्टीलायझर्स चे NPK 10:54:10,NPK 00:48:47,NPK 00:14:48